in

Lakhimpur Kheri Violence: प्रियांका गांधींना अटक, पण लखीमपूर हिंसेतील आरोपी मोकाटच – संजय राऊत

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी नुकतीच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली.या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांनी लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली. शेतकऱ्यांना चिरडल्याच्या प्रकरणात एक व्हिडीओ आला आहे, तो खोटा आहे का ? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

उत्तर प्रदेश सरकारने प्रियांका गांधी यांनाही अटक केली आहे, या मुद्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, सध्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरु, हे स्वातंत्र्य आहे का असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.काँग्रेसचा स्वातंत्र्यापूर्वीपासूचा इतिहास आहे. काँग्रेसच्या नेत्यांना एफआरआय तसेच अटक याला महत्त्व नाही. राजकारणात काम करायचं असेल तरे अटक म्हणजे पुरस्कार असतो,असेही ते म्हणाले. तसेच जी हिम्मत प्रियंका गांधी यांनी दाखवली आहे, ती विरोधकांना उर्जा देणारी असल्याचे राऊत म्हणाले आहेत. तसेच जर कायदा सर्वांसाठी समान आहे, पण प्रियंका गांधी यांना अटक झाली. पण ज्या व्यक्तीमुळे ही घटना घडाली ती व्यक्ती मोकाट असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भारत – बांगलादेश सामना निघाला बरोबरीत

केंद्रीय पथकाने घेतला सांगलीतील पुराच्या नुकसानीचा आढावा…