in

पंतप्रधानांवर विश्वास ठेवता येत नाही; ‘सामना’तून हल्लाबोल

तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे शेतकरी संघटनांनी स्वागत केले, परंतु संसदेत कायदे रद्द होत नाहीत, तोपर्यंत शेतकरी आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिकाही त्यांनी घेतली आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषणा केल्यानंतरही दिल्लीच्या सीमांजवळ सुरु असणारं शेतकरी आंदोलनातील शेतकरी तिथेच बसून आहेत. याच पार्श्वभूमीवर आज शिवसेनेनं पंतप्रधान मोदींबरोबरच सत्ताधारी पक्षावर निशाणा साधलाय. ‘तीन कृषी कायदे मागे घेतल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली खरी, पण शेतकरी आंदोलन मागे घ्यायला तयार नाहीत. मोदी यांनी घोषणा केली, पण त्यांच्यावर विश्वास ठेवता येत नाही. जोपर्यंत संसदेत ठराव करून हे कायदे मागे घेतले जात नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे संयुक्त किसान मोर्चाचे नेते सांगतात,” असं शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे.

संसदेचे अधिवेशन २९ तारखेला सुरू होत आहे. किसान मोर्चाने आधी जाहीर केले होते की, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ५०० शेतकरी ट्रक्टरसह दिल्लीत धडक मारतील, हे आंदोलन सुरूच राहील. याचा अर्थ असा की, देशाच्या पंतप्रधानांचा शब्द मानायला शेतकरी तयार नाहीत. शेतकऱ्यांचा पंतप्रधानांवर विश्वास नाही. पंतप्रधान बोलतात तसे करतीलच याची खात्री नाही. पंतप्रधानांकडे लोकसभेत बहुमत आहे, पण लोकांचा विश्वास गमावला आहे. हे चित्र चांगले नाही,” अशा शब्दांमध्ये शिवसेनेनं सत्ताधाऱ्यांना इशारा दिलाय.

“शेतकरी म्हणतात, कायदे संसदेतच मागे घेतले पाहिजेत व तेच बरोबर आहे. दीड वर्षातील काळात असंख्य शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले, ते मागे घ्यावेत ही मागणी आहे, पण पिकांच्या आधारभूत किमतीचा विषयही शेतकरी नेत्यांनी लावून धरला आहे. शेतकऱ्यांची भूमिका अशी दिसते की, आता नाही तर कधीच नाही. पंजाब-हरयाणाचा शेतकरी ईरेला पेटला की काय करू शकतो हे या आंदोलनाने जगाला दाखवून दिले. पंजाबच्या शेतकऱ्यांना अतिरेकी, खलिस्तानवादी म्हणून हिणवले तरी त्यांनी संयम सोडला नाही, हे विशेष,” असं म्हणत आंदोलक शेतकऱ्यांचं कौतुक केलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

तीन लाख मुलांच्या कोरोना लसीकरणासाठी मुंबई पालिका सज्ज

अमरावतीकरांना संचारबंदीतून दिलासा; रात्रीची संचारबंदी मात्र कायम