राज्यात नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत चांगलं यश मिळाल्यानं आत्मविश्वास दुणावलेल्या शिवसेनेनं आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. यासाठी शिवसेनेनं मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राज्यातील ९०हून अधिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2022मध्ये होत आहेत.
संघटनात्मक उभारणीसाठी शिवसेना राज्यभरात शिवसंपर्क अभियान राबवणार आहे. २४ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत हे अभियान राबवलं जाईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक आयोजित केली होती. या बैठकीला शिवसेनेचे मंत्री, नेते. पदाधिकारी, पक्षाचे जिल्हा प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत रणनिती ठरवण्यात आल्याची माहिती आहे.
Comments
Loading…