in

धक्कादायक ! हॉस्पिटलच्या चेंबरमध्ये आढळले अर्भकाचे हाडे व कवट्या

भूपेश बारंगे | वर्धा : वर्ध्यातील आर्वी येथील प्रतिष्ठित कदम हॉस्पिटलमधील परिसरात तपासणी दरम्यान नवजात अर्भकाचे हाडे व कवट्या आढळल्याची सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.याची शहरात जोरदार चर्चा आहे.कदम हॉस्पिटलच्या परिसरातील बायोगॅस चेंबर मध्ये आढळून आल्याची माहिती आहे.नुकताच केलेल्या गर्भपात अर्भक यात संबध आहे की नाही याचा तपास अहवाल आल्यावरच कळेल. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

आर्वी पोलीस ठाण्यांतर्गत 13 वर्षीय अल्पवयीन मुलगी 5 महिन्याची गर्भवती राहली. त्या मुलीचा कदम हॉस्पिटलमध्ये 30 हजार रुपयात बेकायदेशीर रित्या गर्भपात करण्यात आला. या प्रकरणात डॉ.रेखा कदम यांच्यासह अल्पवयीन मुलांसोबत त्याच्या आईवडीलाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात डॉ.रेखा कदम यांना एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. याप्रकरणात त्यांना सहकार्य करणारी परिचारिकेला अटक करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. आज कदम हॉस्पिटलमध्ये तपासणी करण्यात आली यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील डॉ.हेमंत पाटील व उपनिरीक्षक जोशना गिरी यांनी तपासणी व पंचनामा केला असून अर्भक,मासाचे गोळे, हाडाचा चुरा जप्त केला आहे.

नियमाला बगल, सोनोग्राफी मशीन जप्त
पोलिसांनी हॉस्पिटलची तपासणी केली असता येथे अनेक बाबी उघड झाल्या आहे.शासनमान्य गर्भपात केंद्रात गर्भपात केल्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्याच्या नियमाला बगल देण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले या प्रकरणात सोनोग्राफी मशीन जप्त शील करण्यात आली आहे.

हाडाचे व कवट्याच्या अहवालाची प्रतीक्षा
कदम हॉस्पिटलच्या परिसरातील खोदलेल्या खड्यात हाडे व कवट्या मिळून आल्या आहे. त्याच्या तपासणी करण्याकरीत ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. त्याचा अहवाल येईपर्यंत याकडे लक्ष लागले आहे.

या प्रकरणात आरोपी वाढण्याची शक्यता

कदम हॉस्पिटलमध्ये झालेल्या बेकायदेशीर गर्भपात आता नवनवीन माहिती समोर येत आहे.आज तपासणी केलेल्या प्रकरणात अनेक बाबी उघड झाल्याने आता या प्रकरणात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बेकायदेशीर गर्भपात चर्चेला उधाण
कदम हॉस्पिटलमध्ये अनेकदा बेकायदेशीर गर्भपात सोबत भ्रूणहत्या केल्या जात असल्याच्या चर्चेला शहरात जोरदार उधाण आले आहे. या हॉस्पिटलमध्ये असा प्रकार होत तर नाही ना? याचा तपास केल्यानंतर उघडकीस येऊ शकतो.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी साधणार संवाद

टिकटॉक फेम सूरज चव्हाण झळकणार चित्रपटात,”का रं देवा” चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला