in

श्रेया घोषालने शेअर केला मुलाचा फोटो

बॉलिवूड गायिका श्रेया घोषाल हीने आपल्या मुलाचा फोटो शेअर केला आहे. श्रेयाने तिच्या मुलासोबत अनेक फोटो शेअर केले आहेत. मुलाचे फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केल्यानंतर तिला अनेक सेलिब्रिटींनी तसचं चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रेक्षकांच्या पसंतीची आणि आपल्या मनमोहक आवाजाने लाखो चाहत्यांना भूरळ घालणार्या श्रेया घोषालने नुकतीच चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. श्रेया घोषालच्या घरी २२ मे रोजी चिमुकल्या मुलाच आगमन झालं होतं. यावेळी श्रेयाने “देवाने आशिर्वादाच्या रुपात आम्हाला मौल्यवान मुलगा दिला आहे. अशा प्रकारची भावना या आधी कधीच अनुभवली नव्हती. तुम्हा सर्वांच्या आशिर्वादासाठी धन्यवाद” अशी पोस्ट शेअर केली.

श्रेया घोषालने तिच्या मुलासोबत अनेक फोटो शेअर केले. त्यानंतर तीने मुलाच नाव देवयान असं ठेवलं आहे. मुलाचे फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केल्यानंतर तिला अनेक सेलिब्रिटींनी तसचं चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. (सर्व फोटो सौजन्य : श्रेया घोषाल / इन्स्टाग्राम)

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वर्ध्यात महावितरण कार्यालयावर धडकला बैलबंडी मोर्चा

“देशमुखांची सून ” जिनिलियाचा मराठी उखाणा