in

श्रेयस तळपदे छोट्या पडद्यावर कमबॅक करणार… प्रोमो लॅांच.

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिग्गज अभिनेत्यांनी छोट्या पडद्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपलं वेगळ स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणजे श्रेयस तळपदे. श्रेयस आता एका नवीन मराठी मालिकेद्वारे आपल्या भेटीस येतोय. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ अस या मालीकेच नाव असून झी मराठीने नुकताच त्या मालिकेचा प्रोमो लॅांच केला आहे. त्यात श्रेयस एका कॅफे मध्ये लहानग्या मुलीसोबत बसला असून ती मुलगी तिच्या आईला लग्नाची मागणी घालण्यासाठी श्रेयसची विचारपूस करताना दिसतेय.

श्रेयसला त्याच्या या नवीन इंनिगसाठी सोशल मिडीयातून शुभेच्छांचा वर्षाव सुरु झालाय. या मालिकेत श्रेयससोबत प्राथर्ना बेहरे ही झळकणार आहे. मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेने मराठी सिनेसृष्टीतच नव्हे तर बॉलिवूडमध्ये देखील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. श्रेयसने त्याच्या करियरची सुरवात छोट्या पडद्यावरूनच सुरु केली होती. आभाळमाया, दामिनि, अवंतिका, यांसारख्या मराठी मालिकांमधून श्रेयसने अगदी सुरवातीच्या काळातच आपली छाप पाडली. त्यानंतर ‘सावरखेड एक गाव’, ‘आईशप्प्थ’ या मराठी सिनेमांमध्येसुद्धा तो झळकला होता. यानंतर २००५मध्ये आलेल्या ‘इक़्बाल’ या सिनेमातून श्रेयसने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केल.

आता ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून श्रेयस एका मोठ्या ब्रेकनंतर कमबॅक करतोय. प्रोमो प्रसारित केल्यानंतर अगदी काही तासातच मालिकेच्या प्रोमोला प्रेक्षकांची प्रसिद्धी मिळत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

MPSC। ‘एमपीएसएसी’ संदर्भात मोठी बातमी; रिक्तपदांचा प्रस्ताव पाठवण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आदेश

अंकुश चौधरी लवकरच छोट्या पडद्यावर..