in

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सवास प्रारंभ

हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सवास आजपासून प्रारंभ होत आहे. यानिमित्त आजपासून सर्वच गणेशभक्तांना सांस्कृतिक मेजवानीचा नजराणा रात्री ८ वाजता लोकशाही न्यूज Lokshahi News आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या www.bhaurangari.com संकेतस्थळावर पाहता येणार आहे.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सवाचे उत्सवप्रमुख पुनीत बालन आहेत. यंदा या ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सवाचे दुसरे वर्ष आहे. या महोत्सवाचा आज पहिलाच दिवस असून राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचे “देशवीरांचे चरित्र” या विषयावरील कीर्तनाचे सादरीकरण होणार आहे. हा ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सव लोकशाही न्यूजवर Lokshahi News आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या www.bhaurangari.com संकेतस्थळावर रात्री ८ वाजता पाहता येणार आहे. त्यामुळे या ऑनलाइन महोत्सवाचा गणेशभक्तांनी मनसोक्त आनंद घ्यावा, असे आवाहन लोकशाही न्यूज यानिमित्त करत आहे.

दुसरा ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सव”आयोजित करण्यात आला आहे.10 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या या महोत्सवात कीर्तन, काव्य, चित्रपट संगीत, महाराष्ट्रातील कला, शास्त्रीय संगीत असे विविध कार्यक्रम होणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Karanja (gha) wardha

नेव्हल शिप रिपेअर यार्डमध्ये अँप्रेंटिस पदांच्या जागांसाठी भरती