in ,

देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाढ; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

संपुर्ण महाराष्ट्रातात मान्सूनला सुरवात झाली आणि नदी,नाले ओसंडून वाहू लागले. महाराष्ट्रातील कोकणाला निसर्गाने भरपूर काही दिले.नैसर्गिक साधन संपत्तीने नटलेल्या कोकणातील धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

सिंधुदुर्गात असलेल्या देवघर परीसरात १५ दिवसात झालेल्या पावसाने पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची पातळी १७९.५० मी. पेक्षा जास्त असल्याने पाणी सांडव्यावरुन वाहत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील असलेल्या लोरे.१, लोरे.२, गडमठ,पियाळी, आणि वाघेरी या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.

रात्रीच्यावेळी नागरिकांनी नदी पात्रात ये-जा करु नये,कपडे धुवायला जाणाऱ्या महिला व शेतकऱ्यांना आवश्यक ती दक्षता घ्यावी. तसेच बचव गटातील सदस्यांनी बचाव साहीत्य घेऊन सज्ज राहावे. एखादी आपत्तीजनक स्थिती उद्भवल्यास जिल्हा नियंत्रण कक्षाला माहीती द्यावी. अशा सुचना निवासी उपजिल्हाधिकारी (मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण-सिंधुदुर्ग) शुभांगी साठे यांनी दिल्या.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सोशल मीडिया युजर्संना नवे नियम

आज २१ जून ! या वर्षातील सर्वात मोठा दिवस