in

संगीतकार गायक सलील कुलकर्णी यांना कोरोनाची लागण

राज्यात कोरोनाचा रुग्ण दर वाढत आहे. अनेक कलाकारांना आणि मान्यवरांना कोरोनाची लागण झाली आहे. अशातच संगीतकार, गायक सलील कुलकर्णी यांना कोरोनाची लागण झाली आहे. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली. संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

‘सर्वतोपरी काळजी घेऊनही आज माझी कोविड-१९ चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. घरीच आयसोलेट करून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू केले आहेत. गेल्या एका आठवड्यात जे जे भटले त्यांना कल्पना असावी या दृष्टीनं ही पोस्ट,’ असं सलील कुलकर्णी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

राज्यात आज ३१ हजार ६४३ नवे रुग्ण आढळले आहेत. तर २० हजार ८५४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात गेल्या २४ तासांत १०२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंतच्या कोरोना रुग्णांचा आकडा २७ लाख ४५ हजार ५१८ इतका झाला आहे. तर २३ लाख ५३ हजार ३०७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत ५४ हजार २८३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नाईट कर्फ्युचा दिलासा; नविन रुग्णवाढ किंचित घटली

विदर्भात उद्या उष्णतेची लाट?