in

आंदोलनातील तरुणाच्या समर्थनार्थ सोशल मीडिया ‘ट्रेंडिंग’

जवळपास तीन महिने होत आल्यानंतर अद्याप दिल्लीच्या सिंघू बॉर्डवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने पारित केलेले कृषी कायदे रद्द करावे, यासाठी शेतकऱ्यांनी शड्डू ठोकलाय. या आंदोलना दरम्यान मागील तीन महिन्यात दिल्ली पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष पाहायला मिळाला आहे. यामध्ये काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत.

वारंवार सरकारसोबत फिसकटणाऱ्या चर्चेच्या फेऱ्या सीमावर्ती भागातील तणाव वाढवत आहेत. यातच रणजितसिंग या तरुणाला मारहाण झाल्याचं समोर आलं. त्यातच हा तरुण काही काळासाठी गायब झाल्याचंही समोर आलं. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याचं कळतं. तसेच पोलिसांनीही याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. या संपूर्ण प्रक्रियेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत. आहे. ज्या पद्धतीने २२ वर्षांच्या रणजितसिंहविरोधात खटला दाखल करण्यात आलाय, त्यावर आक्षेप घेण्यात येत आहे.

दिल्ली पोलिसांनी तरुण मुलाच्या चेहऱ्यावर पाय ठेवल्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यानंतर पंजाबच्या नवांशहर जिल्ह्यातील या तरुणाला न्याय मिळण्यासाठी आवाज उठवण्यात येत आहे.

प्रतिमेतील तरुण रणजितसिंग (वय 22) हा पंजाबच्या नवांशहर जिल्ह्यातील काजमापूर गावचा आहे. २ जानेवारीला दिल्ली सीमेवर झालेल्या निषेध मोर्चानंतर त्याला अटक करण्यात आली होती. या ठिकाणी नोव्हेंबरपासून शेतकर्‍यांनी तीन कृषी कायद्यांविरोधात तळ ठोकला होता. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. सध्या रणजितसिंग तिहार तुरूंगात असल्याचं सांगण्यात येतंय.

२९ जानेवारी रोजी काही पत्रकारांनी या घटनेचं चित्रीकरण केलं आहे. याममध्ये दिल्ली पोलीस आणि रॅपिड अॅक्शन फोर्सचे कर्मचारी मागे उभे असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. यावेळी एका जमावाने शेतकऱ्यांवर हल्ला केला. हा जमाव परिसरातील स्थानिक लोकांचा होता, असे प्राथमिक दावे करण्यात आले आहेत. त्यात भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित लोकांचा समावेश असल्याचे काही जणांनी दावा केला. यावेळी शेतकऱ्यांनी जमावाला प्रत्युत्तर देण्याची तयारी केली. त्यावेळी सुरक्षा कर्मचार्‍यांनी कारवाईचा बडगा उगारला आणि जमावाला पांगवण्यासाठी अश्रू धुराचा वापर केला.

हा सर्व प्रकार प्रकार आणि स्थानिक रहिवाशांनी कॅमेर्‍यात कैद केला. अशाच एका व्हिडिओमध्ये रणजित देखील दिसतो. तो प्रवेश करण्यापूर्वी जमावातील सदस्य बॅरीकेड्स ओलांडून दगडफेक करत आणि शेतकर्‍यांवर ओरडताना या व्हिडीओमध्ये दिसत आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

…तर रेल्वे प्रवाशांना बसणार मोठा भुर्दड

अहमदाबादच्या घटनेची पुनरावृत्ती : मोबाइलवर व्हिडीओ तयार करून नाशिकमध्ये तरुणाची आत्महत्या