लोकशाही न्यूज नेटवर्क
कृषी कायदे असो वा भारत-चीन सीमावाद काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निशाण्यावर केंद्र सरकार न राहता केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदीच राहिले आहेत. यावरूनच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान कोणीही असले तरी, राहुल गांधी यांच्याकडून त्यांचा अपमानच झाला असल्याची टीका त्यांनी केली.
राहुल गांधी यांनी काल (12 फेब्रुवारी) पत्रकार परिषद घेऊन, पंतप्रधान मोदी डरपोक आहेत, देशाची पवित्र भूमी चीनच्या सुपूर्द केली, अशी टीका केली होती. यावरून भाजपाने तीव्र प्रतिक्रिया दिली होती. याच पार्श्वभूमीवर सीतारामन यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. त्यांनी यावेळी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या कारकीर्दीतील एका घटनेचा हवाला दिला.
ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत त्या सर्वांना निवडणूक लढवण्याची परवानगी देण्यासाठी मनमोहन सिंग सरकारने 2013मध्ये अध्यादेश जारी केला होता. दिल्लीतील प्रेसक्लबमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत हे ‘नॉनसेन्स’ असल्याचे सांगत राहुल गांधी यांनी हा अध्यादेश फाडला होता. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग अमेरिकादौऱ्यावर होते. याच घटनेचा उल्लेख निर्मला सीतारामन यांनी आज केला.
Comments
Loading…