in

अमरावतीत नवनीत राणा यांच्या विरोधात नारे

नवनीत राणा यांच्या विरोधात शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने खासदार नवनीत राणा यांच जातप्रमाणपत्र रद्द केलं आहे. तसंच, त्यांना दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या पार्श्वभूमीवरब आंबेडकरी संघटनेचे वतीने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालया समोर नवनीत राणा विरोधात जोरदार घोषणाबाजी करत नवनीत राणा मुर्दाबादचे नारे लावले तर अनुसूचित जातीची फसवणूक राणा यांनी केली, त्यामुळे नवनीत राणा यांनी आपला राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी आंदोलन कर्त्यांनी केली.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

चीनच्या कुरापती सुरुच… भारतानंही केलं राफेल तैनात

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर