in ,

वैष्णो देवी परिसात हिमवृष्टी, परिसरात बर्फाचा जाड थर

कटरामध्ये Mata Vaishno Devi Shrine परिसरात हिमवृष्टी झाली आहे. सध्या दृश्यमानता कमी झाल्याने या भागात भाविकांच्या सोयीसाठी असलेली बॅटरी कार, हेलिकॉप्टर सेवा आता बंद करण्यात आली आहे. तसेच जम्मू आणि काश्मीर मधील त्रिकृटा हिल्समध्येही रविवारी वातावरणामध्ये बदल जाणवला. बर्फवृष्टीचा जोर इतका वाढल की, आजूबाजूला बर्फाचा जाड थर साचला आहे. यामुळे लोकांना ये- जा करण्यास अनेक अडचणी येत आहे. हवामानातील बदलामुळे झालेल्या तुफान बर्फवृष्टीचा पर्यटकही आनंद लुटत आहेत. अशाच हवामान खात्याने 7 ते 9 जानेवारी दरम्यान जोरदार हिमवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर कमी दृश्यमानतेमुळे सलग दुसऱ्या दिवशी उड्डाणे उशीराने होत आहेत. या बर्फवृष्टीमुळे काश्मीर खोरे पर्यटकांनी गजबजले आहे. यात सर्व हिल स्टेशन पर्यटकांनी फुलून गेले आहेत, परंतु अशा हवामानामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागतेय. महामार्गासह विविध ठिकाणी संततधार पाऊस आणि हिमवृष्टी आणि हिमवृष्टीमुळे उधमपूरमधील जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग तिसऱ्या दिवशीही वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.


What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आज साधणार मुख्यमंत्र्यांशी संवाद

लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण