in ,

म्हणून राज्यपालांना विमानातून उतरावं लागलं; CM ठाकरे म्हणाले…

लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यपालांना उत्तराखंडमधील मसुरीला आयएएस अकॅडमीच्या सांगता समारोपाला जायचं होतं. आठवड्यापूर्वी राज्यपाल कार्यालयाने मुख्यमंत्री कार्यलयाला परवानगी मागितली होती. मात्र मुख्यमंत्री कार्यलयाकडून परवानगी मिळाली नाही. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना विमान प्रवासाला परवानगी नाकारल्यावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. यावरून भाजप नेते आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. आता यावर मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्टीकरण दिलं आहे.

राजभवन सचिवालयाने राज्यपालांच्या दौऱ्याअगोदर राज्यपालांना विमान वापरण्यास परवानगी मिळाली आहे किंवा नाही याची खातरजमा करून घ्यावयास हवी होती. ती खात्री न केल्याने राज्यपालांसारख्या महनीय व्यक्तीचा खोळंबा झाला. याबाबत राज्य शासनाची कुठलीही चूक नाही, असं मुख्यमंत्री कार्यालयाने स्पष्ट केलंय.

नेमकं काय घडलं?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा आज मसूरी येथे नियोजित दौरा होता. डेहराडून येथून ते मसूरीला जाणार होते. त्यानुसार डेहराडूनला जाण्यासाठी ते सकाळी १० वाजता मुंबई विमानतळावर पोहचले. तिथे ते शासकीय विमानत बसले. मात्र, १५ मिनिटानंतर या विमानातून प्रवास करण्यास राज्यपालांना परवानगी देण्यात आलेली नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर खासगी कंपनीच्या विमानाने राज्यपाल डेहराडूनला रवाना झाले. या सर्व प्रकारावर राजभवनाने आधीच स्पष्टीकरण दिलेले आहे. त्यानुसार राजभवन सचिवालयाने २ फेब्रुवारी रोजीच महाराष्ट्र सरकारकडे रितसर शासकीय विमानासाठी परवानगी मागितली होती. त्याबाबत मुख्यमंत्री कार्यालयालाही कळवण्यात आले होते, असे स्पष्ट करण्यात आलेले आहे.

यावर आता शासनाकडूनही स्पष्टीकरण आले असून हे प्रकरण गंभीर वळण घेण्याची दाट शक्यता आहे. या प्रकारावर सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांतून उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. सरकारला नियमात राहूनच काम करावं लागतं, असे सांगत सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांनी यात काहीही गैर नसल्याचे म्हटले आहे तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी ठाकरे सरकारने पोरखेळ चालवला आहे, असे म्हणत निशाणा साधला आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आपला देश रोजगार निर्मिती करु शकत नाही!

Maratha Reservatio | शरद पवारांना भेटण्यामागचे उदयनराजेंनी सांगितले कारण…