in

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचं फेसबुक पेज हॅक

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचं फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची घटना घडली आहे. याबाबत खुद्द मुंडे यांनीच ट्विटरच्या माध्यमातून आपलं फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची माहिती दिली. तसेच सायबर सेलकडेही तक्रार केली आहे.

धनंजय मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपलं फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची माहिती दिली आहे. मी धनंजय मुंडे या अधिकृत अकाऊंटवरुन अॅडमीन आणि मॉडेरेटर म्हणून कुठलिही अॅक्टिव्हिटी करु शकत नाही. त्यामुळे फेसबुकने लक्ष देऊन लवकरात लवकर मला माझे अॅडमीनचे अधिकार देत पेज सुरु करावे, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी फेसबुककडे केलीय. तसंच याबाबत महाराष्ट्र सायबर सेलकडे आपण रितसर तक्रार दिल्याची माहितीही मुंडे यांनी दिली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत अहानचे बॉलिवूडमध्ये पदार्पण

Aryan Khan Bail Hearing Live | आर्यन खानने ड्रग्जचे सेवन केलेले नाही- रोहतगी