छत्रपती शिवाजी महाराजांची येणारी जयंती साजरी करण्याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करून शिवजयंती साजरी करावी असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. अशातच सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील बाळे गावात लोकआस्था युथ फाउंडेशन तर्फे काही महाविद्यालयीन युवकांनी एकत्रित येऊन अर्ध्या एकरात कडब्यापासून शिवरायांची प्रतिमा साकारली आहे. या आगळ्या वेगळ्या प्रतिमेला पाहण्यासाठी शिवप्रेमींची मोठी गर्दी जमत आहे.
ही प्रतिमा पूर्णपणे पर्यावरण पूरक असून ज्वारीचे रोप वाळवून त्यापासून बनवली आहे. ह्या प्रतिमेला तयार करण्यासाठी दहा दिवसांचा कालावधी लागला. ह्या प्रतिमेची लांबी १४० फूट व रुंदी ७५ फूट एवढी आहे.
ही प्रतिमा तयार करण्यासाठी प्रतिक तांदळे, अभिजय गायकवाड, विवेक उरडे, सुमित काटाळे, गौरव शिंदे, अभिषेक बोरकर, प्रदीप शिंगाडे, समर्थ जोशी, बालाजी आंबुरे या युवकांनी मोठी मदत केली आहे.
Comments
Loading…