in

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने साकारली लाडक्या बालगणेशाची मूर्ती

महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि आपल्या सगळ्यांच्या लाडक्या गणरायाचं घरोघरी आगमन होत आहे. बाप्पाच्या सेवेसाठी सर्व भक्त तयार आहेत.दरवर्षी प्रमाणे अभिनेत्री सोनाली कुलकर्णीकडे देखील गणपत्ती बाप्पा विराजमान होणार आहेत. यंदा देखील सोनाली कुलकर्णीने आणि तिच्या भावाने एकत्र येत गणरायाची मूर्ती घरीच साकारली आहे.

गेल्या तीन वर्षांपासून सोनाली तिच्या भावासोबत घरच्या घरीच बाप्पाची मूर्ती साकारत आहे. सोनालीचा भाऊ मूर्ती साकारतो तर सोनाली या या मूर्तीची रंगरंगोटी करते.सोनालीने बाप्पाची मूर्ती घडवतानाचा एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, “वर्षतली ही सर्वात सुंदर वेळ आहे. 3 वर्षांपूर्वी सुरू केलेला हा प्रयत्न यंदा ही असाच पुढे नेत आहोत…माझा भाऊ अतुल कुलकर्णी शाडू मातीची मुर्ती बनवतो आणि मी हळ्दी-कुंकुवाच्या पाण्यानी रंगवते…तयारी बाप्पा च्या आगमनाची”

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुंबई नाशिक महामार्गावर भीषण अपघात

Dapoli taluka Kudawale goan