in

सोनाली उलगडणार इतिहासाचं आणखी एक पान

लोकशाही न्यूज नेटवर्क

महाराष्ट्रातल्या इतिहासातील एक कर्तृत्ववान स्त्री म्हणजे छत्रपती महाराणी ताराबाई भोसले. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या आणि छत्रपती राजाराम भोसले यांच्या पत्नी असणाऱ्या ताराबाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजीमहाराज यांच्यामागे कणखरपणे स्वराज्याची धुरा सांभाळली. अशा रणरागिणीची शौर्यगाथा सर्वांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने राहुल जनार्दन जाधव दिग्दर्शित ‘छत्रपती ताराराणी’ या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे.

डॉ. जयसिंगराव पवार लिखित ‘मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी’ या चरित्रग्रंथावर आधारित या चित्रपटात ताराराणीची भूमिका सोनाली कुलकर्णी साकारणार आहे. क्रिएटिव्ह मदारी प्रस्तुत या चित्रपटाची पटकथा आणि संवाद डॉ. सुधीर निकम यांचे असून त्याला अवधूत गुप्ते यांचे संगीत लाभले आहे.

औरंगजेबासारख्या क्रूर,बलाढ्य आणि महत्वाकांक्षी बादशहाला लढा देणाऱ्या या रणरागिणीची शौर्यगाथा आणि तिचे वैयक्तिक आयुष्य प्रेक्षकांना ‘छत्रपती ताराराणी’ या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात होणार आहे.

सोनाली कुलकर्णी ने तिच्या सोशल मिडीयावर या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्ट सोबत “छत्रपती ताराराणींचं प्रेरणादायी आयुष्य आणि तडफदार व्यक्तिमत्व पडद्यावर आणण्याचं भाग्य लाभणं म्हणजे एका कलाकारासाठी किंबहुना एका मराठी मुलीसाठी आयुष्यातली सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट आहे.पण त्याच बरोबरीने आजवर ज्या रणरागिणी विषयी कुठल्याही चलचित्र माध्यमात फार काही केलं गेलं नाही, तिच्या कर्तृत्वाचे पोवाडे गाणं हे अत्यंत आव्हानातमक काम असेल, या जबाबदारी ची जाणिवही मला आहे. महाराजांचा आशिर्वाद आम्हाला लाभो, आई भवानीने आमच्या मनगटात ही कामगिरी पार पाडण्याचं बळ भरावं बस हीच प्रार्थना” असे कॅप्शन दिले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“पूजाच्या प्रकरणात तक्रारही दाखल न करणारे सेलिब्रिटी ट्वीटबाबत आक्रमक”, भाजपाचा टोला

भारत मजबूत स्थितीत…इंग्लंड दिवसाअखेर ३ बाद ५३