in

इंधन दरवाढ थांबवा; सोनिया गांधींचं पंतप्रधानांना पत्र

गेल्या काही दिवसांपासून इंधन दरात सातत्यानं चढउतार पाहायला मिळत आहेत. संपूर्ण देशभरात याविषयी चिंतेचा सूर उमटला आहे. याच मुद्यावरुन काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. वाढत्या इंधन दरवाढीबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. इंधन दरवाढ कमी करून मध्यमवर्गीय आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

इंधन दरवाढीनं गाठलेला उच्चांक ऐतिहासिक आणि अव्यवहारिक आहे. देशातील अनेक भागात १०० रुपये प्रतिलिटरच्या पुढे गेले आहेत. यामुळे देशातील नागरिक त्रस्त झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेलाच्या किमती मध्यमस्तरावर आहेत. विशेष म्हणजे, यूपीए सरकारच्या काळापेक्षा आता इंधन तेलाच्या किंमती कमी आहेत, असेही त्या म्हणाल्या.

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे इंधनाचे दर वाढले आहेत. मात्र, मोदी सरकार वारंवार पूर्वीच्या सरकारवर खापर फोडत असते. सरकारनं राजधर्माचं पालन करावं आणि इंधनाच्या किंमती कमी कराव्यात, असंही सोनिया यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

TikTok स्टार समीर गायकवाडची आत्महत्या; पुण्याजवळील केसनंद मधील प्रकार

राममंदिरासाठी ‘चंदा वसुली’ करण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे भाव खाली आणा