in

महानायक अमिताभ बच्चन आणि डॅनी पुन्हा ‘या’ चित्रपटात एकत्र येणार

बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय चित्रपट निर्माते सूरज बडजात्या एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.या चित्रपटाचे नाव ‘ऊंचाई’ असून हा त्यांचा सातवा चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण ऑक्टोबर महिन्यात सुरु होणार आहे.

महानायक अमिताभ बच्चन आणि डॅनी डॅन्झोपा खूप दिवसांनंतर या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करणार आहेत. चाहते बिग बी आणि डॅनी यांना एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत.‘ऊंचाई’ हा चित्रपट मैत्रीवर आधारित आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि डॅनी डॅन्झोपा यांच्यासोबतच अनुपम खेर, बोमन ईराणी, नीना गुप्ता, परिणिती चोप्रा आणि सारिका हे कलाकार दिसणार आहे.

‘पिंकव्हिला’च्या वृत्तानुसार, हा चित्रपट चार मित्रांच्या आयुष्यावर आधारित आहे. या मित्रांचे वय हे ६० वर्षांपेक्षा अधिक आहे. अमिताभ बच्चन, बोमन ईरानी, अनुपम खेर आणि डॅनी डॅन्झोपा हे चार मित्रांची भूमिका साकारणार आहेत.हा चित्रपट सूरज बडजात्या यांच्या मनाच्या जवळील चित्रपट असणार आहे. तसेच चित्रपट निर्मात्यांनी आजवरच्या चित्रपटांपेक्षा हा थोडा वेगळा चित्रपट असणार असल्याचे म्हटले आहे. तसेच सलमान खान चित्रपटात पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Bhayandar east

6 जिल्ह्यांच्या पोटनिवडणुकांचं वेळापत्रक जाहीर