in

द. आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेला प्रवासी कोरोनाबाधित

जगावर कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा धोका घोंगावत असताना राज्याची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेचा केपटाऊन डोंबिवलीत (Dombivli) आलेल्या एका प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याचं आरोग्य विभागाच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे.

या रुग्णाचे नमुने मुंबई येथे जीनोम सिक्वेन्सिंग साठी पाठवले जाणार असून त्याला ओमिक्रॉन विषाणूची लागण झाली आहे का हे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होऊ शकणार आहे. सध्या या रुग्णाला महापालिकेच्या विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर या रुग्णाच्या भावाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून त्याच्या कुटुंबाची तपासणी आज केली जाणार असल्याचे महापालिकेच्या विभागाच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रतिभा पानपाटील यांनी सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Omicron Corona | दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

आजपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन, पहिल्याच दिवशी विविध मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत