in ,

नीरव मोदीला विशेष न्यायालयानं बजावले समन्स

पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदी याला मुंबईतील विशेष न्यायालयाने समन्स बजावले आहेत. त्यामुळे नीरव मोदीला आता पुढील महिन्यात ११ जून रोजी न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुंबईतील विशेष न्यायालयाने नीरव मोदीच्या नावे समन्स बजावले असून त्याला पुढील महिन्यात ११ जून रोजी न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नीरव मोदी हजर राहण्यात अपयशी ठरल्यास फरार आर्थिक गुन्हेगार कायद्यानुसार न्यायालय कारवाईचे आदेश देईल, असं देखील या नोटिशीमध्ये नमूद आहे.

पीएनबी घोटाळा उघड झाल्यापासून नीरव मोदी भारताबाहेर पळून गेला होता. सध्या तो ब्रिटनमध्ये आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी ब्रिटनमधील स्थानिक न्यायालयाने नीरव मोदीला भारतात प्रत्यार्पण करण्यास मंजुरी दिली असून प्रत्यार्पणाविरोधातली त्याची याचिका फेटाळून लावली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

लसीच्या दोन डोसमधलं अंतर वाढवलं, केंद्राचा मोठा निर्णय

एक लाख दंड आणि पंचांची थुंकी चाटा; दुसरे लग्न केलेल्या महिलेला जात पंचायतीची शिक्षा