in

Maharashtra Lockdown: कोरोनाची साखळी तोडणारा ‘स्पाइडरमॅन’!

राज्यातील प्रत्येक नागरिकांसमोर कोरोना सारखी भयावह परीस्थिती उभी ठाकली असताना, प्रत्येक नागरिक आपला जीव मुठीत धरून जगताना दिसत आहे. त्यात मुंबईत एक व्यक्ती ‘स्पाइडरमॅन’चा वेश परिधान करून बस, बस थांबे, सार्वजनिक ठिकाणे सॅनिटायझ करत आहे. या ‘स्पाइडरमॅन’ची सॅनिटायझ सेवा मुंबईतली कोरोनाची साखळी तोडण्यास काही प्रमाणात तरी मदत करत आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी एकीकडे राज्यसरकार प्रयत्न करत असताना, आता मुंबईचा समाजसेवक अशोक कुर्मी हा ‘स्पाइडरमॅन’चा वेष परिधान करून छत्रपती शिवाजी महाराज स्थानकाबाहेर बस, बस थांबे तसेच सार्वजनिक ठिकाणी सॅनिटायझ करत आहेत.

या संदर्भात त्यांच्याशी लोकशाहीने बातचीत केली असता, अशोक कुर्मी यांनी जेव्हापासून कोरोना सुरू झाला आहे,तेव्हापासून नागरिक जास्तीत जास्त लोकांना पीपीई किटमध्ये पाहत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये नवीन आशा व उमेद निर्माण करण्यासाठी मी हे वेश परिधान केले असून सर्वत्र सार्वजनिक परिसर सॅनिटायझ करत आहेत. जेणेकरून सार्वजनिक प्रवास करणाऱ्या नागरिकांना कोरोनाची लागण होणार नाही.

अशोक कुर्मी यांच्या या कार्याचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. तर कुर्मी यांच्या या कार्याने राजाय्तील कोरोना साखळी काही प्रमाणात तुटण्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ज्येष्ठ पत्रकार अशोक तुपे यांचं निधन

RCB Vs RR: बंगळुरुसमोर विजयासाठी 178 धावांचं लक्ष्य