in ,

श्रीनगरमध्ये पोलिसांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा गोळीबार, दोन पोलीस शहीद

जम्मू-कश्मीरमधील श्रीनगर येथे पोलिसांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला आहे. या गोळीबारात दोन पोलीस शहीद झाले आहेत. हे दोन्ही पोलीस कर्मचारी श्रीनगर विमानतळाला श्रीनगर शहराशी जोडण्यासाठी बनवण्यात येणाऱ्या रस्त्याच्या सुरक्षेसाठी तैनात होते. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून, या फुटेजमध्ये एक दहशतवादी एके – 47 घेऊन दबा धरून बसलेला दिसत आहे. त्यानंतर तो तेथील मुख्य बाजारातही शस्त्र घेऊन फिरताना देखील दिसत आहे. या दहशतवाद्याची ओळख पटवून त्याला शोधण्याची मोहीम राबवली जात आहे. या दहशतवाद्याच्या जोडीला अन्य एक दहशतवादीही दिसत आहे.

पोलिसांनी या परिसराला घेरलं असून शोधमोहीम राबवण्यात येत आहे. 17 फेब्रुवारी रोजीही असाच दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. त्यात तेथील ढाब्यावर काम करणारा एक कर्मचारी जखमी झाला होता.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आदित्य ठाकरे यांचे पर्यावरणप्रेम म्हणजे ढोंगबाजी, मालाडच्या वृक्षकत्तलीवरून भाजपाचा हल्लाबोल

”अमरावती, यवतमाळमध्ये परदेशी स्ट्रेन आढळला नाही”