in

SSC-HSC Exam | दहावी, बारावी परीक्षा ऑफलाईन होणार

दहावी-बारावी बोर्डाची परीक्षा वेळापत्रकानुसार जाहीर केलेल्या तारखेलाच ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत. कोरोनाची परिस्थिती आहे त्यात मुलांची आरोग्य, सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे. खूप साऱ्या तज्ज्ञांशी शिक्षण विभाग बातचित करत आहे, असं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

ऑगस्टला आम्ही सिलॅबस कमी करण्याचं काम केलं. नोव्हेंबरमध्ये बोर्डाने पेपर पॅटर्न ठरतो त्याची तपासणी कशी करायचं हे ठरतं. गावखेड्यात पेपर पोहोचवायला कमीत कमी दोन महिने लागतात. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दीड ते दोन महिने लागतात. आठवी नववी परीक्षेबाबत लवकरच निर्णय घेऊ, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

बोर्डाच्या परीक्षेबाबत सूचना, मागण्या काही लोकांनी दिल्या आहेत. मात्र पेपर पॅटर्न आणि त्यानुसार मार्क्स असतात व पेपर त्यानुसार तयार केलेले असतात. त्यात काही गोष्टीची आवश्यकता असेल तर तज्ज्ञ व्यक्तींचं मार्गदर्शन घेऊन निर्णय घेऊ, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. पुढच्या वर्षाच्या अभ्यासक्रमसाठी विद्यार्थ्यांचा यावर्षीचा पाया मजबूत होणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचं शिक्षण अजूनही सुरू राहू द्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी शाळा बंद आहेत, त्यामुळे विद्यार्था ऑनलाईन शिकत आहेत. विद्यार्थ्यांचं शिक्षण सुरू राहावं हा आमचा प्रयत्न आहे. परीक्षेसंदर्भात लवकरच सांगू, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

अंतिम वेळापत्रक राज्य मंडळाच्या www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे प्रात्याक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांना कळवण्यात येणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra budget session | सुधीर मुनगंटीवारांचा अजित पवारांविरोधात हक्कभंग प्रस्ताव

व्हायरल पोस्टची झाली चर्चा, फडणवीसांनी मानले आभार अन् अजितदादांकडून कारवाईचे आश्वासन