in , ,

SSR Death case | सुशांतच्या मित्रांचा NCB कडून शोध सुरू; नोकर केशव-नीरज साक्षीदार होणार

अभिनेता सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात सुशांतच्या जवळच्या मित्रांचा शोध सुरु करण्यात आला आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने सुशांतच्या सोबत राहणाऱ्या व्यक्तींचा शोध सुरु केला आहे. सुशांतसोबत गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, सिद्धार्थ पिठाणी याशिवाय सुशांतचे नोकर केशव बचनेर, नीरज सिंग असे अनेक जण राहत होते.

मुंबईत उपलब्ध असलेल्या व्यक्तींची अनेक यंत्रणांनी चौकशी केली होती. मात्र सिद्धार्थ पिठाणी, केशव, नीरज हे तेव्हा मुंबईच्या बाहेर पळून गेले होते. एनसीबी अधिकाऱ्यांनी सिद्धार्थ पिठाणी याचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे, तर केशव आणि नीरज यांना साक्षीदार करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाशी संबंधित ड्रग्ज रॅकेटचा तपास एनसीबीही करत असून दाखल गुन्ह्यात आतापर्यंत 35 जणांना अटक करण्यात आली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांची प्रकृती बिघडली

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ‘अच्छे दिन आने वाले हैं’