in

ST Employee Strike | गोपीचंद पडळकर- सदाभाऊ खोत ‘आझाद’; नवे नेतृत्व अॅड गुणरत्न सदावर्तेकडे

आझाद मैदानात सूरू असलेले गोपीचंद पडळकर- सदाभाऊ खोत यांचे स्वतंत्र आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा पडळकर- खोत यांनी केली. यानंतर तात्काळ काही मिनिटांध्ये अॅड गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेत आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांना आंदोलनातून आझाद केल्याचा चिमटा काढला. आता विलीनीकरणासाठी आंदोलन डंके की चोट पे असल्याचा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे एस. टी. आंदोलनाच्या नेतृत्वात फूट पडल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले.

राज्यभरातील एसटी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी राज्यसरकारने बुधवारी ऐतिहासिक पगारवाढीचा पर्याय दिला तर विलिनीकरणाच्या निर्णयावर समितीच्या निर्णय मान्य करणार असल्याची सरकारची भुमिका होती. त्यानंतर आज आझाद मैदानात गोपीचंद पडळकर- सदाभाऊ खोत यांनी आम्ही आमचे स्वतंत्र आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली, यासह इतर जिल्ह्यातील आंदोलन एसटी कर्मचाऱ्यांना सुरू ठेवायची असेल तर सुरू ठेवू शकता असेही ते म्हणाले.

सदावर्ते यांनी गुरुवारी एक पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी सुरुवातीलाच सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांना लक्ष्य केले. खोत आणि पडळकरांनी पोलिसांच्या गराड्यात पत्रकार परिषद घेतली. तेव्हा तुम्ही काय ते समजून घ्या. त्यांना सरकारने आपल्यात घेतल्याचे त्यांनी सांगितले. या खोत आणि पडळकरांना आम्ही आंदोलनातून आझाद केले आहे, असा घणाघात त्यांनी केला.

सदावर्ते म्हणाले की, एस. टी. कामगारांची ही लोकचळवळ आहे. हा खोत-पडळकर यांनी एकट्यांनी पुकारलेला लढा नाही. कामगार नेते दत्ता सामंत यांच्या हत्येनंतर 70 वर्षांनी ही अभूतपूर्व लोकचळवळ सुरू आहे. सदाभाऊ खोत आणि पडळकरांनी स्वतःसाठी या आंदोलनाला स्थगिती दिली. आम्ही विलीनीकरणासाठी डंके की चोट पे, हे आंदोलन सुरूच ठेवू, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी कर्मचाऱ्यांनीही जोरदार घोषणाबाजी केली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

दीड वर्षानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

Ind vs NZ, Live 1st Test, Day 1 : श्रेयस अय्यरनं पदार्पणातचं झळकावलं अर्धशतक