in

ST Employee Strike | एसटी महामंडळाचं राज्य शासनात विलिनीकरण…,अजित पवार म्हणाले

संदीप जेजुरकर, कळवण ( नाशिक ) : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना संप मिटता मिटत नाही आहे. अजूनही एसटी कर्मचारी आपल्या विलिनीकरणाच्या मागणीवरून आपल्या संपावर ठाम आहेत. सरकारने काही अंशी मागण्या मान्य केल्य़ा तसेच संप मागे न घेतल्यास कठोर कारवाईचाही इशारा दिला आहे. मात्र तरीही एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. या सर्व प्रकरणात आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आंदोलक कर्मचाऱ्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे.

तुटेपर्यंत ताणू नका, राज्य सरकार दोन पाऊले मागे आले, तुम्ही पण थोडं मागे या..योग्य तो विचार करा..लवकरच शाळा सुरू होताय..त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला डोळ्यासमोर ठेवा..सगळ्यांचा विचार करा..एस.टी. कर्मचाऱ्यांनो तूम्हालाही कुटुंब चालवायचं आहे..सरकारने आपल्या पगारात देखील वाढ केली असल्याचे अजित पवार म्हणाले आहेत.

तसेच विलीनीकरणाच्या मुद्द्यावर समितीचा अहवाल आल्यावर त्यावर सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात येणारच आहे असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. ते कळवण – सुरगाणा विधानसभा मतदार संघातील १८३ कोटी रुपयांच्या विकास कामांचा ऑनलाईन भूमिपूजन व लोकार्पण सोहळा पार पडला त्यावेळी ते बोलत होते.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षांच्या काळाबद्दल बोलतांना त्यांनी समाधान व्यक्त केले, सरकार टिकणार नाही म्हणून देव पाण्यात ठेवणाऱ्यांनाही यामुळे उत्तर मिळाले, सरकार सर्वच स्तरावर चांगले काम करत असल्याचे त्यांनी सांगितले..

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘सौ दर्द छुपे है सीने मे…छगन भुजबळांची शायरीमधून टीका

Ind vs NZ 1st Test | चौथ्या दिवसअखेर न्यूझीलंडची 1 बाद 4 धावा, 284 धावांचं लक्ष्य