in ,

दिवाळीच्या सुट्टीत पर्यटनासाठी एसटी सज्ज

आगामी दिवाळी सण आणि येणाऱ्या सलग सुट्ट्यांमध्ये पर्यटनाला आणि गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी एसटी पुन्हा एकदा सज्ज झाली असून एसटी महामंडळाने राज्यभरातील आगारातून दररोज सुमारे १ हजार जादा गाड्यांचे नियोजन केले असल्याचे समजत अहे. २९ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर २०२१ या दरम्यान या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती देतानाच ‘ या जादा गाडया आरक्षणासाठी उपलब्ध होणार आहेत, प्रवाशांनी या जादा गाड्यांचा लाभ घ्यावा ‘ असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी केले.

दिवाळीच्या सुट्टीत प्रवाशी महाराष्ट्रातील अनेक पर्यटन स्थळांना भेट देतात, तर काही आपापल्या गावी जातात. किफायतशीर दर आणि सुरक्षित प्रवास म्हणून प्रवासी दरवर्षी एसटीतून प्रवासाला प्राधान्य देतात. गेल्यावर्षी राज्यावर असलेले कोरोनाचे संकट पाहता प्रवाशांनी पर्यटनाकडे पाठ फिरवली होती.

यंदा महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी नियमित गाड्या व्यतिरिक्त राज्यभरातील आगारातून दररोज १००० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ‘ सुट्ट्यांमुळे प्रवाशांची होणारी वाढती गर्दी पाहता गाड्यांचे योग्य नियोजन करा, सर्व बसेस सुस्थितीत ठेवा. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमिवर खबरदारीचा उपाय म्हणून सर्व गाड्या स्वच्छ आणि निर्जंतुकीकरण कराव्यात, तसेच प्रवाशांनीही प्रवासादरम्यान मास्क लावणे, सॅनिटाईजचा वापर आदी कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे ‘असे निर्देश मंत्री, ॲड. परब यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; लाखांची रोकड हस्तगत

अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करणाऱ्याला मनसे कार्यकर्त्यांचा चोप