in

St Employee Strike | सांगलीत एसटी संप सूरूच, 73 कर्मचारी कामावर बस फेऱ्याही सुरू

संजय देसाई, सांगली | राज्यसरकारच्या ऐतिहासिक पगारवाढीनंतर मुंबईच्या आझाद मैदानातील आंदोलन भाजप आमदार गोपिचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी स्वतंत्ररीत्या तात्पुरते मागे घेतल्याची घोषणा केली. यानंतर सुद्धा सांगलीतील एसटी कर्मचारी आपल्या संपावर ठाम आहे.

आझाद मैदानातील आंदोलन तात्पुरते स्थगित केल्याची घोषणा भाजपा आमदारांनी केल्यानंतर सुद्धा सांगलीतील एसटी कर्मचारी आपल्या संपावर ठाम आहे. विलीनीकरणाशिवाय माघार न घेण्याचा निर्णय सांगलीतील एसटी कर्मचाऱ्यांनी घेत आपले आंदोलन सुरूच ठेवले आहे.

तर दुसरीकडे सांगली डेपोत 73 कर्मचारी रुजू झाले असून यामध्ये 50 चालक आणि 23 वाहकांचा समावेश आहे. हजर झालेल्या कर्मचाऱ्याकडून सांगली जिल्ह्यातील 9 मार्गावर एसटी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत 50 हुन अधिक बस फेऱ्या झाल्या असून अजूनही एसटी कर्मचारी कामावर हजर होण्यास येत असल्याने उद्यापासून सांगली एसटी डेपोतील एसटी वाहतूक ही काही अंशी पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

IND vs NZ 1st Day | पहिल्या दिवसअखरे भारताच्या ४ बाद २५८ धावा

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे रूग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांचे ट्विट