in

एसटी संपावर तोडगा निघणार ? शरद पवार, अजित पवार आणि अनिल परब यांची गुप्त बैठक संपली

राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार, उप मुख्यमंत्री अजित पवार आणि परीवहन मंत्री अनिल परब यांच्यातली गुप्त बैठक संपन्न झाली आहे. या बैठकीत एसटी आंदोलनावर चर्चा करण्यात आली. त्यामुळे या बैठकीनंतर एसटी आंदोलनावर तोडगा निघणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान आता थोड्याच वेळात अनिल परब गुप्त बैठकीबाबत माहिती देणार आहेत.

शरद पवार, अजित पवार आणि अनिल परब यांच्या वरळी सेंटर हॉटेलमध्ये गुप्त बैठक पार पडली.तब्बव साडे चार तास या बैठकीत चर्चा झाली. एसटी कामगारांचे विविध प्रश्न , एसटीचं विलीनीकरण राज्य सरकारमध्ये करण्यात यावं ही प्रमुख मागणी आहे. या सर्व प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अहमदनगरचा सुदर्शन कोतकर बनला ‘उत्तर महाराष्ट्र केसरी’

‘बिग बॉस मराठी 2’ विजेता शिव ठाकरेच्या गाडीला भीषण अपघात