in

St Worker Strike | वेतनवाढीच्या प्रस्तावानंतरही तिढा, संप मागे घेण्याबाबत कर्मचारी संघटनेचा आज निर्णय

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळात बुधवारी झालेल्या बैठकीत विलीनीकरणाऐवजी कर्मचाऱ्यांचा पगारवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला. यामध्ये एसटीच्या पहिल्या श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात पाच हजार रुपयांची वाढ करण्याची घोषणा परब यांनी केली. मात्र, आंदोलक कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. संप मागे घेण्याबाबत कर्मचारी संघटना आज, गुरुवारी निर्णय जाहीर करणार आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपप्रकरणी सह्याद्री अतिथीगृह येथे अनिल परब, एसटीचे अधिकारी, आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत व एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची बुधवारी बैठक झाली. त्यानंतर मूळ वेतनात वाढ करण्याचे परब यांनी जाहीर केले. विविध श्रेणीतील कर्मचाऱ्यांना साधारण ४१ टक्क्यांपर्यंत वेतनवाढ देण्यात येणार आहे. एसटीच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ असल्याचे परब यांनी सांगितले. याशिवाय वेळेवर वेतन, प्रोत्साहन भत्ता देण्याचे आश्वासनही शासनाने दिले.

यामुळे महिन्याला ६० कोटी रुपये अतिरिक्त बोजा पडेल. कोरोनाकाळात एसटीचे प्रचंड नुकसान झाले असून, या काळात कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य शासनाने २ हजार ७०० कोटी रुपये मदत केल्याचे परब यांनी सांगितले. वेतनवाढीच्या निर्णयानेही एसटी कर्मचारी संघटनांचे समाधान झालेले नाही. या संघटना विलीनीकरणाच्या भूमिकेवर ठाम आहेत. सरकारच्या निर्णयाबाबत चर्चा करून गुरुवारी संपाबाबत भूमिका स्पष्ट करणार असल्याचे कर्मचारी संघटनांच्या नेत्यांनी सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

प्लॅटफॉर्म तिकीटचे दर पूर्ववत, मध्य रेल्वेची माहिती

राज्यातील 105 नगर पंचायत निवडणूक घोषणा, नगरपंचायत परिसरात आजपासून आचारसंहिता लागू