in

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक; ओबीसी आरक्षणावर चर्चेची शक्यता

राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज (बुधवार) दुपारी साडेतीन वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे होणार आहे. या बैठकीमध्ये काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

ओबीसी राजकीय आरक्षण संपुष्टात आल्यानंतर राज्य सरकारसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. याबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच सण उत्सवाच्या दिवसात कोरोना रुग्णांची वाढती संख्या याबाबत देखील चर्चा होणार आहे.

सण उत्सवाच्या काळात रुग्ण संख्या वाढल्यास निर्बंध अजूनही कडक करावे लागतील असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच दिले आहेत. गणेशोत्सव राज्यभर उत्साहात साजरा केला जातोय. यातच नवरात्र, दिवाळी हे सण तोंडावर आहेत. त्यामुळे निर्बंधांबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

इन्फोसिस-पांचजन्य वादात रघुराम राजन यांची उडी; म्हणाले…

दिल्लीतल्या कारवाईनंतर महाराष्ट्र ‘अलर्ट मोड’वर; गृहमंत्र्यांनी बोलावली बैठक