in

राज्याचा आर्थिक पाहाणी अहवाल : उद्योग, सेवा क्षेत्रात घसरण तर, कृषी क्षेत्रातील चित्र आशादायी

कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यामुळे लागू करण्यात आलेला लॉकडाऊन याचा फटका अर्थव्यवस्थेला बसला आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात आज (5 मार्च) राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल 2020-21सादर केला. 2020-21 अर्थसंकल्पी अंदाजानुसार, राज्याच्या तिजोरीत 1 लाख 56 हजार 925 कोटींची तूट अपेक्षित आहे, तर, पूर्वअनुमानानुसार देशाप्रमाणेच राज्य अर्थव्यवस्थेत उणे 8 टक्के वाढ अपेक्षित आहे.

कोरोनाचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर झाला आहे. प्रमुख क्षेत्र असलेल्या सेवा, कृषी आणि उद्योग यापैकी कृषी क्षेत्रात सकारात्मक वाढीचा अंदाज आहे. उद्योग आणि सेवा क्षेत्रांत अनुक्रमे उणे 11.3 टक्के आणि उणे 9 टक्के वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. कृषी क्षेत्रात मात्र दिलासादायक चित्र आहे. या क्षेत्रात 11.7 टक्के वाढ अपेक्षित असून पशुसंवर्धन (4.4 टक्के), वने व लाकूड तोडणी (5.7 टक्के) आणि मत्स्यव्यवसाय व मत्स्यशेती (2.6 टक्के) या क्षेत्रांमध्ये समाधानकारक चित्र आहे. राज्य सरकारने लागू केलेल्या कृषी कर्जमुक्ती योजनेअंतर्गंत एकूण 31 लाख शेतकऱ्यांचे 19 हजार 847 कोटींची कर्ज माफ करण्यात आले आहे.

तर दुसरीकडे, लॉकडाऊनचा परिणाम निर्मिती आणि बांधकाम क्षेत्रावर जास्त झाल्याचे दिसते. त्यामुळेच निर्मिती क्षेत्रात उणे 11.8 टक्के आणि बांधकाम क्षेत्रात उणे 14.6 टक्के अशी वाढ होण्याचा अनुमान आहे. दरडोई उत्पन्नात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची पिछेहाट झाली आहे. महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न 2,02,130 रुपये आहे. देशामध्ये महाराष्ट्र पाचव्या स्थानी आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी अर्णब गोस्वामीना दिलासा

पाहा आजचे सोन्याचे भाव