in

Maharashtra Unlock; राज्य 5 टप्प्यात अनलॉक होणार, मंत्री विजय वड्डेटीवार मोठे विधान

राज्यातील कोरोनाचा घटता आलेख पाहता आता निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार आता राज्य 5 टप्प्यात अनलॉक होणार असल्याची माहिती मंत्री विजय वड्डेटीवार यांनी दिली आहे.

सध्याच्या परिस्थितीत ५ टप्प्यांमध्ये अनलॉक आणि लॉकडाउन केलं जाणार आहे. या ५ टप्प्यांमध्ये ज्या जिल्ह्यात ५ टक्के पॉझिटिव्हिटी रेट आहे आणि ऑक्सिजन बेड २५ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्युपाइड आहेत, अशा जिल्ह्यात संपूर्ण अनलॉक होईल. यामध्ये रेस्टॉरंट, मॉल, नियमित दुकानं किंवा ट्रेन देखील सुरू होतील. जिल्हे आणि महानगर पालिकांचे धरून एकूण ४३ भाग पाडले आहेत. या सर्व नियमांची उद्यापासून अंमलबजावणी केली जाणार आहे”, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

पहिल्या टप्प्यातील 18 जिल्ह्यात सर्व व्यवहार सुरु राहणार आहे. तसेच या जिल्ह्यातील जमावबंदीही शिथिल करण्यात येणार आहे. या टप्प्यात औरंगाबाद, भंडारा, धुळे, गडचिरोली, ठाणे, वर्धा, वाशीम, यवतमाळ, गोंदिया, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक यासह इतर जिल्ह्याचा समावेश आहे.

मुंबई, मुंबई उपनगर आणि नंदुरबार दुसऱ्या टप्प्यात असल्याने या जिल्ह्यात निर्बंध अंशत शिथिल होणार आहेत.

तिसऱ्या टप्प्यात अकोला, बीड, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतो. तर उर्वरित जिल्हे हे रेड झोनमध्ये येतात.

जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्येचा आढावा दर शुक्रवारी घेतला जाणार आहे. यामध्ये पॉझिटिव्हिटी रेट, ऑक्सिजनची आवश्यकता यावरुन जिल्ह्यांची लेव्हल ठरवली जाणार आहे. राज्यात दुसऱ्या ते पाचव्या टप्प्यात जमावबंदी असेल.

तसेच ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट कमी आहे तेथे खाजगी,सरकारी कार्यालये 100 टक्के सुरू राहणार आहेत. तर लग्न सोहळ्यासाठी 200 लोकांची परवानगी आहे.

पाच टप्पे ?

पहिला टप्पा : पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्के, तसेच ऑक्सिजन बेड 25 टक्क्यांपेक्षा कमी व्यापलेले असावेत.

दुसरा टप्पा : पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के ऑक्सिजन बेड्स 25 ते 40 टक्क्यांदरम्यान व्यापलेले असावेत.

तिसरा टप्पा : पॉझिटिव्हीटी रेट 5 ते 10 टक्के असावा. ऑक्सिजन बेड्स हे 40 टक्क्यांपेक्षा जास्त व्यापलेले असतील

चौथा टप्पा : पॉझिटिव्हीटी रेट 10 ते 20 टक्के असेल. तसेच येथे ऑक्सिजनचे बेड 60 टक्क्यांच्या वर व्यापलेले असतील.

पाचवा टप्पा : पॉझिटिव्हीटी रेट 20 टक्क्यांच्या वर आणि ऑक्सिजन बेड हे 75 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात व्यापलेले असतील.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

…तर ओबीसी आरक्षण रद्द करण्याची हिंमत झाली नसती, फडणवीसांचा सरकारवर हल्लाबोल

TET Certificate| टीईटी प्रमाणपत्राची वैधता आयुष्यभर राहणार, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा निर्णय