in

“राज्याची 450 मेगावॅट विजेची तूट भरून निघणार”

मंगेश जोशी | जळगाव : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील कोळसा भावी बंद झालेला 500 मेगावॅट संच कार्यान्वित करण्यात आला. यामुळे राज्याची 450 मेगावॅट विजेची तूट भरून निघणार असून भारनियमनापासून वीज ग्राहकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. मात्र दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील इतर तीन संच मात्र कोळसा अभावी अद्यापही बंद आहेत.

राज्यात कोळशाच्या टंचाई अभावी भुसावळ नाशिक चंद्रपूर अमरावती सह वीज निर्मिती केंद्रातील संच बंद पडले होते. त्यामुळे राज्यावर भारनियमनाचे गडद संकट ओढावले. मात्र भुसावळ दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील 500 मेगावॅटचा संच कार्यान्वित करण्यात आल्याने राज्याची 450 मेगावॅट विजेची तूट भरून निघणार असून यामुळे भारनियमनापासून काहीसा दिलासा मिळणार आहे. मात्र दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील अद्यापही तीन संच हे कोळसा अभावी बंद आहेत. त्यात राज्यातील अनेक औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील संच बंद पडल्याने भारनियमनाचे सावट अद्यापही कायम आहे.

भुसावळ दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात 500 मेगावॅट संच कार्यान्वित केल्याने भारनियमनाला काहीसा दिलासा मिळाला असला तरी दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात केवळ दिवस पुरेल एवढाच कोळसा साठा शिल्लक आहे. दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्राला प्रति दिवशी 21 हजार मेट्रिक टन कोळशाची गरज आहे मात्र तूर्तास तरी दीड दिवसाचा कोळशाचा साठा शिल्लक असून मागणीप्रमाणे कोळसा मिळत राहिल्यास 500 मेगावॅट चे दोन्ही संच सुरू राहणार असल्याची माहिती दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील मुख्य अभियंता विजय राठोड यांनी दिली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

लहान मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा, कोव्हॅक्सिनला आपत्कालीन मंजुरी

मला आजही वाटते मी मुख्यमंत्री आहे , ‘मी पुन्हा येईन‘ ची आशा- देवेंद्र फडणवीस