in

CoronaVirus : राज्यात नव्या रुग्णांची संख्या 3 हजारांच्या वरच!

लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यात आज पुन्हा नव्या रुग्णांची संख्या तीन हजारांच्या वरतीच आढळली. त्यामुळे चिंतेचे वातावरण कायम आहे. तथापि, जवळपास सहा हजार रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने तेवढाच दिलासा मिळाला आहे.

दिवसभरात नव्या 3 हजार 279 कोरोना रुग्णांचे निदान झाले. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 51 लाख 63 हजार 781 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 20 लाख 52 हजार 905 नमुने (13.54 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 1 लाख 66 हजार 785 व्यक्ती होमक्वारंटाइन असून राज्यात सध्या 30 हजार 265 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

तब्बल 6 हजार 107 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण 19 लाख 70 हजार 53 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यानुसार रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.84 टक्के झाले आहे. तर, राज्यात आज 25 करोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण 51 हजार 415 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प निश्चितच लवकर पूर्ण होणार – गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड

India vs England | टी 20 मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा