in

जात पंचायतीतील संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करावी – प्रवीण दरेकर

नाशिकमधून जात पंचायतचीचे अमानुष प्रकरणं समोर आले आहे. या घटनेत महिलेचे चारित्र्य तपासण्यासाठी तिला उकळत्या तेलात हात घालायला लावण्याचा अमानुष प्रकार घडलाय. या अघोरी प्रकारावर आता भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

प्रवीण दरेकर या घटनेवर निषेध व्यक्त केला आहे. ते म्हणाले, जात पंचायतीने नाशिकमध्ये एका महिलेला उकळत्या तेलात हात घालण्याची शिक्षा दिली ती निषेधार्थ असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच समाजात अशा माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेत सहभागी असलेल्या जात पंचायतीतील संबंधित व्यक्तींची चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

प्रकरण काय ?

पारधी समाजातील एका व्यक्तीने आपल्या पत्नीवर चारित्र्याचा संशय घेतला. अशा वेळी जातपंचायत विचित्र न्यायनिवाडा करून महिलेचे चारित्र्य तपासते. सदर पतीने तीन दगडांची चुल मांडली. सरपण लावून चुल पेटवली. चुलीवर तेल टाकलेली कढई ठेवली. तेलाला उकळी आल्यावर नवऱ्याने पाच रूपयांचे नाणे त्या तेलात टाकले. व ते नाणे रिकाम्या हाताने बाहेर काढण्यास सांगितले. महिलेने खुप विरोध करूनही पतीने तीचे चारित्र्य तपासण्यासाठी तेलात हात घालण्याची जबरदस्ती केली. उकळत्या तेलातुन नाणे बाहेर काढताना महिलेचा हात भाजला नाही तर तिचे चारित्र्य शुद्ध असे समजले जाते व हात भाजला तर चारित्र्य शुद्ध नाही, असे समजले जाते. अशा अमानुष न्यायनिवाड्याला अनुसरून सदर महिलेने उकळत्या तेलात हात घातला व तिचा हात भाजला आहे. नवऱ्याने या घटनेचा व्हिडिओ काढला व व्हायरलही केला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Ind Vs Eng; टी-20 साठी ‘या’ तीन युवा खेळाडूंची भारतीय संघात निवड

आधी तुमची मानसिकता बदला… अतुल भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांना टोला