सांगलीच्या शिराळा तालुक्यातील येसलेसवाडी येथे जिलेटीन (सुरुंग) केपच्या वायरला मोबाईल बॅटरी जोडल्याने स्फोट होऊन करण तुकाराम येसले हा शाळकरी मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
येसलेवाडी येथील करण येसले व त्याचे मित्र गुरुवारी संध्याकाळी माळरानावर खेळत असताना गावाशेजारील झुडपात त्यांना जिलेटीन सुरुंग कांड्या दिसल्या. त्यांनी त्या कांड्या घरी आणल्या आणि संध्याकाळी आठच्या सुमारास ही सर्व मुले एकत्र येऊन कट्टयावर बसली असता, त्यांनी गम्मत म्हणून काय होतंय बघण्यासाठी जिलेटीन कॅपच्या दोन तारा मोबाईलच्या बॅटरीला जोडल्या असता मोठा स्फोट झाला.
दरम्यान, हा स्फोट इतका भयानक होता की, करण येसले यांच्या जबड्याला मोठी इजा होऊन तो जखमी झाला आहे. जबड्याच्या वरच्या बाजुचे दात तुटून मोठी जखम झाली आहे, तर जवळच बसलेल्या इतर मुलांना लहान मोठ्या जखमा झाल्या आहेत.
Comments
Loading…