in

कोरोनाची छडी : राज्यातील अनेक निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांची चाचणी पॉझिटिव्ह

Pneumonia coronavirus

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असताना निवासी शाळांना मोठा झटका बसताना दिसत आहे. या शाळांमधील कित्येक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. शाळांमध्ये कोरोना घुसल्याने विद्यार्थ्यांचा जीव संकटात सापडला आहे.

वाशिम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील देगाव येथील एका निवासी शाळेत बुधवारी 229 विद्यार्थी कोरोनाबाधित आढळले. याशिवाय, तेथील तीन कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी देखील पॉझिटिव्ह आली आहे. याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनीही या शाळेला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे.

तर, दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी गावातील गतीमंद विद्यार्थ्यांच्या निवासी शाळेतील 42 विद्यार्थी आणि 8 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या शाळेत राज्यभरातून विद्यार्थी आलेले आहेत. 14 फेब्रुवारी रोजी 6 विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर आता आणखी विद्यार्थी आणि शिक्षक पॉझिटिव्ह आढळल्याने चिंतेचे वातावरण आहे. शिवाय लातूरमधील वसतीगृहात 40 विद्यार्थ्यांचीही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

सातारा जिल्ह्यातील 16 शाळांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. साताऱ्यातील पुसेगावच्या सेवागिरी विद्यालयात 23 विद्यार्थ्यांना कोरोना झाला आहे. तर, विदर्भात कोरोनाचा विळखा घट्ट होत असून नागपूर जिल्ह्यातील पाटणसावंगीतील ग्रामीण शाळेत 16 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटच्या वसतीगृहात 75 विद्यार्थ्यांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. त्यातच वाशिम जिल्ह्यातील देगाव आदिवासी निवासी शाळेत 229 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात अशीच स्थिती आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोरोनाचे सावट : विधिमंडळ अधिवेशन चालणार 10 दिवस, 8 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प

पाहा ‘एवढ्या’ कोटींच आहे सुपरस्टार धनुषचे घर…