in

नदीवर सिंचन प्रकल्प उभारण्यासाठी तात्काळ प्रस्ताव सादर करा – अब्दुल सत्तार

abddul satar

प्रतिनिधी : अनिल साबळे

सिल्लोड येथील निल्लोड धरणाला जाणाऱ्या गाव नदीवर ब्रिज कम केटीवेअर या पद्धतीने सिंचन प्रकल्प तसेच सदरील नदीवर संरक्षण भीत उभारण्यासाठी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी बनकीन्होळा गावात भेट दिली. यावेळी गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर या समस्यांचे निराकरण करण्यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना गावात बोलावून घेत सिंचन प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने गावातील नियोजित जागेची पाहणी केली. यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी रस्ता व सिंचन कामसंबंधी अधिकाऱ्यांना निर्देशित केले.

बनकिन्होळा येथे स्मशानभूमीकडे जाण्यासाठी गाव नदीतून जावे लागते. याठिकाणी पूर्वी असलेले सिंचन प्रकल्प मोडकळीस आलेले असून येथील नळकांडी पुलात कचरा अडकल्याने पाणी दुसऱ्या बाजूला वाहते यामुळे परिसरातील शेतांचे नुकसान होते. यामुळे मोठी दुर्घटना घडू शकते शिवाय नदीत पाणी असतांना स्मशानभूमी कडे तसेच या परिसरात जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. यासाठी सदरील जागेवर ब्रिज कम केटीवेअर, तसेच गाव हद्दीपर्यंत नदीवर संरक्षण भिंत उभारण्यासाठी तात्काळ कारवाईचे आदेश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

corona Update | देशात अद्याप कोरोनाची दुसरी लाट कायम

Maharashtra ZP and Panchayat Samiti Election | जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांना स्थगित