in ,

चंद्रपुरात ड्रॅगन फ्रुट शेतीचा प्रयोग यशस्वी

चंद्रपूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्यानं ड्रॅगन फ्रुट शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. कवडू बोढे असं या शेतकऱ्याचं नाव असून ते वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडमध्ये नोकरीत होते. निवृत्तीनंतर त्यांनी काहीतरी वेगळं करण्याचं ठरवलं. त्यांनी आपल्या दोन एकरमध्ये ड्रॅगन फ्रुटची शेती करण्याचा निर्धार केला. त्यासाठी त्यांनी कृषी विभाग आणि या फळाच्या लागवडीचा अभ्यास केला.

या कामात त्यांच्या ग्रामसेवक मुलानेदेखील मदत मुलगा रवीनेही मदत केली. त्यांनी 2018 साली ड्रॅगन फ्रुटची लागवड केली. पाहिले दोन वर्षे जेमतेम पीक आल्यानंतर आता तिसऱ्या वर्षी चांगले उत्पादन हाती येण्याची शक्यता आहे. ड्रॅगन फ्रुटला बाजारात 200 ते 250 रुपये किलोचा भाव आहे.दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यातच या फळाला मोठी मागणी आहे. ड्रॅगन फ्रुटची शेती हा जिल्ह्यासाठी नवा आणि पहिलाच प्रयोग आहे. तो यशस्वी झाल्याने इतरांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

…अन मोदी म्हणतात कशी तुझी जिरवली; अजित पवार यांची पंतप्रधानावर पवार स्टाईल टीका

अटकेपार ! इंग्लंडच्या हॉटेलमध्ये सांगलीच्या बाळू लोखंडेची लोखंडी खुर्ची!