in

यशस्वी गिरणी कामगार, वारसांना दिलासा; कागदपत्रे सादर करण्यासाठी दिली मुदतवाढ

मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा विभागीय घटक) दि. ०१ मार्च, २०२० रोजी काढण्यात आलेल्या सदनिका सोडतीतील यशस्वी गिरणी कामगार/ वारस यांना मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी दिनांक ९ ऑक्टोबर, २०२१ पर्यंत ३० दिवसांची अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे.

       मुंबई मंडळातर्फे गिरणी कामगार सोडतीमधील यशस्वी गिरणी कामगार/ वारस यांनी त्यांच्या अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर प्रथम सूचना पत्र पाठवण्यात आली. सदर प्रथम सुचना पत्रानुसार मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुंबई स्थित शाखेमध्ये कागदपत्रे सादर करण्यासाठी दिनांक १२ जुलै, २०२१ ते दिनांक ०९ सप्टेंबर, २०२१ पर्यंत ६० दिवसांचा कालावधी देण्यात आला.   मात्र, बहुतांश गिरणी कामगार / वारस यांनी उपरोक्त कालावधीमध्ये मुंबई बँकेत कागदपत्र सादर केलेले नाहीत. तसेच सदर सोडतीमधील यशस्वी गिरणी कामगार/ वारस यांना देण्यात आलेल्या प्रथम सुचना पत्रांपैकी विविध कारणांमुळे काही प्रथम सूचना पत्र पोस्टाकडून परत आलेली आहेत. पोस्टाकडून परत आलेल्या प्रथम सूचना पत्रांची यादी म्हाडाचे अधिकृत संकेतस्थळ https://mhada.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

        कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव तसेच महाराष्ट्रातील उपरोक्त कालावधीमध्ये पूर सदृश्य परिस्थितीचा विचार करता गिरणी कामगार/वारस यांना सदर ३० दिवसांची अंतिम मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी दिली.

         सोडतीमधील ज्या यशस्वी गिरणी कामगार/ वारस यांनी प्रथम सुचना पत्रानुसार मुंबई बँकेमध्ये कागदपत्रे सादर केले नाहीत तसेच विविध कारणांमुळे पोस्टाकडून परत आलेले गिरणी कामगार/ वारस यांचे प्रथम सूचना पत्र मुंबईतील वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयातील उपमुख्य अधिकारी, गिरणी कामगार कक्ष, मुंबई मंडळ, कक्ष क्रमांक २०५, पहिला मजला या कार्यालयातून स्वीकारून मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुंबईस्थित शाखेमध्ये ९ ऑक्टोबर, २०२१ पूर्वी सादर करावेत, असे आवाहन मुंबई मंडळातर्फे करण्यात येत आहे.

मुंबई मंडळातर्फे गिरणी कामगार/वारसांसाठी बॉम्बे डाईंग टेक्सटाईल मिल, बॉम्बे डाईंग स्प्रिंग मिल व श्रीनिवास मिलच्या जागांवर उभारण्यात आलेल्या ३ हजार ८९४ सदनिकांची संगणकीय सोडत दि. १ मार्च २०२० रोजी काढण्यात आली होती.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुलुंडमध्ये ऑलिम्पिक बाप्पा; तरुणांना खेळांमधील कारकिर्दीसाठी दिले प्रोत्साहन

“रश्मीताई, तालिबानी प्रवृत्तीच्या मुसक्या कधी आवळणार ?”