in

स्थलांतरित शाळाबाह्य ऊसतोड मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत ऑनलाईन धडे

कोरोनाकाळात शाळा बंद झाल्या तरी मुलांचे online शिक्षण सुरु होते. मात्र स्थलांतरीत आणि शाळाबाह्य मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न कायम होता. यावर पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील नांदूर मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका रोहिणी लोखंडे यांनी पर्याय शोधला. रोहिणी लोखंडे यांनी शाळाबाह्य ,स्थलांतरीत मुलांसाठी ऑनलाईन धडे सुरू करत त्यांना मुख्य प्रवाहात आणलं.

गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने आणि पुण्यातील सामाजिक संस्थेच्या सहकार्याने ऑनलाईन शिक्षणाचे धडे घेत आहेत.

दरवर्षी वेगवेगळ्या जिल्ह्यातून ऊसतोड कामगारांच्या टोळ्या दौंड तालुक्यात येत असतात. त्यांच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न अद्याप कायम आहे. अशातच कोरोनामुळे शाळा बंद असल्याने स्थलांतरीत मुलांना शिक्षण घेणे अवघड होते. मात्र जिल्हा परिषदेच्या शिक्षिका रोहिणी लोखंडे यांनी मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे.

रोहिणी लोखंडे यांनी नांदूर भागात सर्व्हे करून त्यांना ऊसतोडीवाल्यांची २० मुले दिसली. ही मुले औरंगाबाद ,जळगाव ,धुळे या जिल्ह्यातून आपल्या पालकांबरोबर आलेली होती. शिक्षिका लोखंडे यांनी स्वयंसेविका मायाताई गिरमे यांच्या मदतीने दोन महिने रात्रशाळा चालवली. पुढे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे ऑनलाईन शिक्षण चालू केले. मात्र पालकांकडे आर्थिक परिस्थितीमुळे मोबाईल नसल्याने अक्षरमानव संस्थेच्या माध्यमातून ५ नवीन मोबाईल मिळवले.आणि त्यावर मुले अभ्यास करू लागले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Mithun Chakraborty Birthday | जाणून घ्या… मिथुन चक्रवर्ती यांचा थक्क करणारा प्रवास

कोरोना लसीकरणात खारीचा वाटा; ‘या’ खासदाराने केली मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत