in

बीडमध्ये शिवसेना उप जिल्हा प्रमुखांवर जीव घेणा हल्ला

विकास माने | बीड जिल्ह्यात शिवसेना उप जिल्हा प्रमुखांवर जीव घेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात ते फार जखमी झाले आहेत. हनुमान जगताप असं उपजिल्हा प्रमुखाचे नाव असून परळी रोडवरील घोडका राजुरी जवळ ही घटना घडली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सूरू आहे.

बीडच्या परळी रोडवरील घोडका राजुरी जवळ असताना शिवसेना उप जिल्हा प्रमुख हनुमान जगताप यांच्यावर 8 ते 10 जणांकडून तलवार लाठ्या काठ्यांनी हल्ला करण्यात आला. मारहाण करून जगताप यांना तलावात टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र हा प्रयत्न फैसला, परिसरातील नागरिकांनी प्रसंगावधान दाखवल्यानं जगताप यांचा जीव वाचला. जगताप यांना जिल्हा रुग्णालयात उपचाराखातर दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सूरू आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

उल्हासनगरमधील रस्ते अखेर खड्डेमुक्त होण्याची आशा

जॅकलिनची ईडीकडून चौकशी… मनी लाँडरिंग प्रकरण भोवणार?