in

बजाज फायनान्सच्या जाचाला कंटाळून वर्ध्यात कर्जबाजारी व्यक्तीची आत्महत्या

भूपेश बारंगे | वर्ध्यातील सेलू येथील कृष्णा श्यामराव देवतारे यांनी वर्ध्याच्या बजाज फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून झाडाला गळफास घेतला आहे. आत्महत्येपूर्वी या व्यक्तीने चिठ्ठी लिहून संबंधित व्यक्तींची नावे स्पष्ट केल्याने बजाज फायनान्ससह दोघांविरुद्ध सेलू पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत कृष्णा देवतारे यांनी बजाज फायनान्स कंपनीकडून 1.50 लाखाचे कर्ज घेतले होते. त्या कर्जाची नियमित परतफेड करायचे. मात्र कोरोनाच्या संकटात आर्थिक अडचणीत सापडल्याने या महिन्याचा हप्ता चुकला. हप्ता भरला नसल्यामुळे फायनान्स कंपनीचे कर्मचारी त्यांना त्रास देत होते. तसेच घरी जाऊनही धमकावत असायचे, असे समोर आले आहे. याचा मानसिक त्रास झाल्याने कृष्णा देवतारे दोन दिवसांपासून घरातून निघून गेले होते. घरच्यांनी त्यांचा शोधही घेतला. परंतु काहीच पत्ता न लागल्याने त्यांनी सेलू पोलिसात तक्रार दिली.

दरम्यान आज केळझर शिवारात वर्धा नागपूर मार्गावरील दफतरी यांच्या पेट्रोल पंप नजीक पंक्चर दुकानामागे झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत सेलू पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर त्यांच्या खिश्यात लिहिलेली चिठ्ठी सापडली.

याप्रकरणी सेलू पोलिसात बजाज फायनान्ससह अतुल बालपांडे व करण पाठक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस ठाण्यातून देण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सुनील गाडे , पोलीस श्री नाईक, अमोल राऊत रत्नाकर कोकाटे करत आहे.

मृत्यूपूर्वी चिठ्ठीत लिहलेलं…

मी कृष्णा देवतारे वय 50 रा. सेलू आज आत्महत्या करत आहे.
याचा जबाबदार बजाज फायनान्सचे अतुल बालपांडेव्ही करण पाठक आहे. माझे EMI 2 तारखेला बाऊन्स झाली. मी पेनाल्टी भरण्यासाठी तयार असूनही त्यांना सांगूनही ते माझ्या घरी यायचे. त्यामुळे मला मानिसक तणावही आला.

प्रिय मोहित, सौ मनीषा मी तुमच्यातून जात आहे.पण मी खूप दिवसापासून विचार करत राहिलो. तुम्ही मला धीरही दिला. पैश्यांचा धीर ही दिला. पण माझी सहन करण्याची क्षमता संपलेली होती.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“पूजा चव्हाण प्रकरणातील क्लोजर रिपोर्ट अद्याप तपास अधिकाऱ्यांकडेच”

SSC Board Result 2021 | तांत्रिक बिघाडानंतर चौकशी समितीची स्थापना