in

मेळघाटात महिला वनअधिकाऱ्याची आत्महत्या, वरिष्ठांच्या जाचामुळे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा

मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हरिसाल वनपरिक्षेत्राच्या आरएफओ दीपाली चव्हाण यांनी आज सायंकाळी गोळी झाडून आत्महत्या केली. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे.

दिपाली चव्हाण या गुगामल वन्यजीव विभागात वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून गत पाच वर्षापासून कार्यरत होत्या. आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आपल्या निवासस्थानी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी दीपाली चव्हाण यांनी नऊ पानांची सुसाईड नोट लिहिली होती. पोलिसांनी ही सुसाईड नोट ताब्यात घेतली आहे. रेंजर असोसिएशनने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Corona Virus : राज्यात उद्रेक वाढला, 35,952 नवे रुग्ण; मृतांचा आकडाही शंभरच्या पुढे

प्रताप सरनाईक सांगतात, ‘ती’ अफवाच!