in ,

अहमदाबादच्या घटनेची पुनरावृत्ती : मोबाइलवर व्हिडीओ तयार करून नाशिकमध्ये तरुणाची आत्महत्या

अहमदाबादमध्ये 23 वर्षीय आयेशाने साबरमती नदीत उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना अलीकडेच समोर आली होती. त्यापाठोपाठ आता नाशिकमध्येही याच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. एका तरुणाने मोबाइलवर व्हिडीओ तयार करून आत्महत्या केली.

गुजरातच्या अहमदाबादमधील आयेशा बानो नामक २३ वर्षीय विवाहितेने साबरमती नदीत उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने एक व्हिडीओ बनवला. हा हुंडाबळीचा प्रकार असल्याचे सांगण्यात येत आहे. 25 फेब्रुवारीची ही घटना आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी शोध घेतला आणि राजस्थानच्या पालीमधून सोमवारी तिच्या नवऱ्याला अटक केली.

असाच प्रकार नाशिकमध्येही उघडकीस आला आहे. योगेश हिवाळे या तरुणाने मोबाईलवर व्हिडीओ करून सोमवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. योगेशची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून पोलिसाच्या जाचाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे त्याने या व्हिडीओत म्हटले आहे. नाशिकमधील गंजमाळ परिसरात भीमवाडी याठिकाणी ही घटना घडली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आंदोलनातील तरुणाच्या समर्थनार्थ सोशल मीडिया ‘ट्रेंडिंग’

कोल्हापूरमध्ये कोरोना साहित्य खरेदीत ३५ कोटींचा घोटाळा ? भाजपचा गंभीर आरोप