in

यवतमाळच्या सुमितने साकारला नारळातून गणपती

पर्यावरण संवर्धन काळाची गरज असल्याची मागणी अनेकजण करतात. मात्र प्रत्यक्ष आपल्या कृतीतून न्याय देण्याचा प्रयत्न फार कमी असतो. अशातच यवतमाळच्या प्रयोगशील सुमितने नारळापासून तयार केलेली गणेशमूर्ती बघण्यासाठी जिल्हाभरातून भाविकांची रीघ लागली आहे.

यवतमाळ शहरातील मारवाडी चौक येथील सुमित हेमंत महेंद्र हा पदवीधर तरुण प्रयोगशील म्हणून ओळखल्या जातो. त्याला विविध संकल्पनेची कला अवगत आहे. दरवर्षी पर्यावरण संवर्धनाची विविध प्रयोग घेऊन तो समोर येत असतो.यावर्षी त्याने चक्क नारळापासून गणेशमूर्ती बनवली आहे. नारळामधेच त्याने सुबक आणि आकर्षक कोरीव काम केले आहे. यासोबतच त्याने घरामध्ये जुट पासून तयार केलेला पर्यावरण पूरक देखावा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो आहे.

याशिवाय सजावटीसाठी केलेली आरास जूटपासून बनवलेल्या सुतळीची आहे.त्याच प्रमाणे ग्लास आणि झुंबर आदी वस्तू बनवण्यासाठी त्याबे जूटचा वापर केला आहे. त्याने साकारलेली रांगोळी सुद्धा नारळाच्या जटांच्या बुगध्यापासून तयार करण्यात आली आहे. समुद्र किनाऱ्यावर जणू गणपती बाप्पा विराजमान झाले असा आकर्षक देखावा त्याने साकारला आहे. सुमितचे कलाकौशल्य यवतमाळकरांसाठी मान उंचावणारा ठरतो आहे .यापूर्वीही त्याने डिस्पोजल वापरातून गणेशमूर्तीची निर्मिती केली होती.मागील वर्षी साकारलेल्या गणपती ,सरस्वती आणि लक्ष्मी यामुर्तुंना २०२० चा आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता.यावर्षी त्याने साकारलेली कलाकृती बघण्यासाठी भाविकांची रीघ लागत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

OBC Reservation ओबीसी आरक्षण : राज्यभरात भाजपाकडून तीव्र आंदोलनं

उदयनराजे भोसले यांनी एकनाथ शिंदे यांची घेतली भेट