in

सुपरस्टार रजनीकांत मेडिकल चेकअपसाठी अमेरिकेला जाणार

भारतीय सिनेसृष्टीचे दिग्गज अभिनेते सुपरस्टार रजनीकांत यांना गेल्यावर्षी २५ डिसेंबर रोजी रक्तदाब वाढल्यामुळे हैदराबादेतील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. रजनिकांत हे वैद्यकीय चाचण्यांसाठी विशेष विमानाने अमेरिकेला जाऊ इच्छित होते. कोरोना वैश्विक माहामारीच्या संकटामुळे त्यांनी खाजगी विमानाने अमेरिकेला जाण्यासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागीतली होती. केंद्राने रजणीकांत यांना परवानगी दिली असून लवकरच ते विषेश विमानाने अमेरिकेला रवाना होणार आहेत.

रजनीकांत यांच्या या विशेष विमानात 14 लोकांची आसन क्षमता आहे. रजनीकांत यांच्यासोबत काही कुटुंबातील सदस्यही जाणार आहेत. साऊथ सिनेसृष्टीत देवासारखे पुजले जाणरे रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड आहे. १२ डिसेंबर १९५० रोजी बेंगळुरुतील एका मराठी कुटुंबात जन्मलेल्या रजनीकांत यांचा प्रवास अद्भूत आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत त्यांच्याइतकी लोकप्रियता कुणालाच मिळवता आली नाही.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज ठाकरे यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त ५३ रूपये प्रति लिटरने पेट्रोलची विक्री

Corona Vaccination | 11 कुष्ठरोगी नागरिकांनी घेतली कोरोना लस